भाईजानची महाजन यांच्या महा आरोग्य शिबिरास कोट्यवधीची मदत

salman-khan
येत्या ९ जानेवारीला जळगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभिनेता सलमान खानने अडीच कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतची माहिती गिरीश महाजन यांनी दिली असून आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात अनेक शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर्स भाग घेणार आहेत. ह्रदय विकार अणि मेंदू विकाराच्या नाजुक अणि महागडया शस्त्रक्रिया ही तिथे होणार आहेत. जळगावमध्ये या शस्त्रक्रिया शक्य नसल्यास मुंबई अणि पुणे येथे संबंधित रुग्णाला नेवून त्याच्यावर उपचार करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. या उपक्रमसाठी अनेक संस्था, उद्योगपती अणि काही प्रतिष्ठित मंडळीनी सहाय्य केल्याचे त्यांनी सांगितले.