दहा हजारांपर्यंत येणार ट्विटरची शब्दमर्यादा ?

twitter
नवी दिल्ली : १४० वरुन दहा हजारांपर्यंत सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची अक्षरमर्यादा वाढण्याची शक्यता असून नेटिझन्सवर सध्याची मर्यादा ही बंधन घालणारी आहे.

गेल्या अऩेक दिवसांपासून विचार मांडण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी अधिक जागेची गरज व्यक्त होत असून त्याचा विचार करून मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. मात्र मुख्य वॉलवर पहिले १४० शब्दच दिसतील आणि संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी नव्या पेजवर जावे लागेल. त्यामुळे ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या नेटिझन्सना दिलासा मिळणार असला, तरी मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया म्हणून ट्विटरचा यूएसपी यामुळे पुसला जाण्याची शक्यता आहे. या भीतीपोटीच मर्यादावाढीच्या वृत्तानंतर ट्विटरचा शेअर कमालीचा पडला आहे.