कावासाकीची दमदार २०१६ काँकर १४ एबीएस बाईक

kawasaki
दमदार बाईक उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कावासाकीने अशीच आणखी एक दमदार बाईक कावासाकी काँकर १४ एबीएस २०१६ सादर केली आहे. ही बाईक ग्राहकांना दोन बाईक चालविल्याचा आनंद देऊ शकेल कारण ही सुपरस्पोर्टस आणि टूरिंग बाईक म्हणून वापरता येणार आहे. या बाईकचा टॉप स्पीड ताशी २५० किलोमीटर्स इतका आहे. अमेरिकेत या बाईकची किंमत आहे १५४९९ डॉलर्स.

या बाईकला चार व्हॉल्व्ह, चार सिलींडर वाले लिक्विड कूल स्ट्रोक डीओएचसी इंजिन दिले गेले आहे. १३५२ सीसीचे हे इंजिन सिक्स स्पीड ट्रान्समिशनने जोडलेले आहे. बाईकला मल्टी लेव्हल पॉवर मोडस, जीपीए रिसिव्हर्स, एएम, एफएम, एमपी थ्री, आयपॉड साऊंड सिस्टीमसारखी अत्याधुनिक फिचर्स आहेत. ही बाईक मेटॅलिक स्पार्क ब्लॅक व मेटॅलिक मून डस्ट ग्रे अशा दोन रंगात उपलब्ध आहे. शिवाय बाईकला पुरेशी स्टोरेज स्पेसही दिली गेली आहे.

Leave a Comment