हर्बिन आईस अॅन्ड स्नोवर्ल्ड फेस्ट सुरू

ice-show
जगातला चौथा मोठा आईस अॅन्ड स्नोवर्ल्ड फेस्टीव्हल चीनमधल्या हर्बिन शहरात सुरू झाला असून येथे बर्फात कोरलेली असंख्य नयनमनोहर शिल्पे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. चीनच्या हिलोंगजियांग प्रांतातील हर्बिन शहरात यंदाचा फेस्टीव्हल होत आहे. यापूर्वी असे फेस्टीव्हल सेपोरो, नॉर्वे व क्युबेकमध्ये भरविले गेले आहेत. हर्बिन हे छोटेसे शहर अतिथंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे.

हर्बिन म्युनिसिपल गव्हर्नमेंट व कल्चरल टूरिस्ट ग्रूप यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ७ लाख ५० हजार चौरस मीटर परिसरात ही हिमशिल्पे साकारली गेली असून त्यात पॅलेस, अनेक मोठमोठ्या इमारती, ग्रेट वॉल ऑफ चायना सारखी शिल्पे बर्फाने बनविली गेली आहेत. येथे ४६ मीटर उंचीचे आईस स्कल्प्चरही पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरपासून ही शिल्पे साकारायला कलाकारांनी सुरवात केली होती. जगभरातून त्यासाठी कलाकार येथे जमले आहेत. या महोत्सवाची सुरवात २१ डिसेंबरपासून झाली असली तरी त्याचे औपचारिक उद्घाटन ५ जानेवारीला झाले आहे.

Leave a Comment