लग्न करण्याची शाही ठिकाणे

wedding
प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न सोहळा हा फार महत्त्वाचा असतो. आयुष्याची गाठ बांधून घेणाऱ्या आपल्या जोडीदारासोबत या क्षणांत जास्तीत जास्त आनंद लुटता यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच या क्षणांसाठी एखादे झकास स्थळ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो.

अडव्हेंचर हवे असणाऱ्यांसाठी
wedding1
हिरवाईने नटलेला भूप्रदेश, स्वच्छ पाण्याचा अथांग समुद्र आणि सुंदर बिच अशी पार्श्वभूमी लग्न सोहळ्यासाठी अतिशय उत्तम ठरू शकते. अंदमान-निकोबार बेटे एक सध्या भारताती उत्तम वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक मानले जाते. अडव्हेंचरची हौस असणाऱ्या कपल्स ना येथे वॉटर स्पोर्टसचा आनंद देखील घेता येऊ शकतो. पोर्ट ब्लेअर सारख्या ठिकाणी वॉटर स्किलिंग, स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डाइव्हसारखे एकसे एक वॉटर स्पोर्टस आपल्याला अनुभवता येतात. अंदमान-निकोबारला हवाई मार्गाने तसेच समुद्र मार्गे जहाजातून जाता येते. तुम्हाला चेन्नई, कोलकाता, भुवनेश्वर येथून अंदमान-निकोबारसाठी फ्लाइटस् उपलब्ध आहेत. तसेच चेन्नईतून फेरी बोटीचीही सुविधा आहे.

फॅन्सी हाउसबोट वेडिंग
wedding2
लग्न सोहळ्यासाठी समुद्र किनारा असलेले आणखी एक ठिकाण म्हणजे केरळ. तुम्हाला शांतता अनुभवायाची तर केरळ अतिशय उत्तम वेडिंग डेस्टिनेश ठरू शकते. कोल्लम, कोटी आणि वरका येथील बॅक वॉटरमध्ये असलेल्या हाउस बोटमध्ये लग्न समारंभ संस्मरणीय ठरू शकते. केरळ बस, कार बरोबरच रेल्वे आणि विमान सेवेने संपूर्ण देशाशी जोडलेले आहे. केरळमध्ये इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी कोची आणि तिरूअनंतपुरम येथे तुम्हाला जावे लागते.

शाही लग्न सोहळ्यासाठी
wedding3
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे राजस्थान नेहमीच शाही थाटासाठी ओळखला जातो. राज पॅलेस, राम बाघ पॅलेस आमी जय महाल पॅलेस येथे लग्न सोहळा तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरू शकतो. उदयपूर येथील द लेक पॅलेस हॉटेल हा आणखी सर्वोत्तम ऑप्शन असू शकतो. राजस्थानमधील जयपूर, उदयपूर आणि जोधपूर ही शहरे देशातील प्रमुख शहरांशी रस्ते मार्गाने जोडली गेली आहेत. ही शहरे निश्चितच तुमच्या लग्न सोहळ्याची शोभा आणखी वाढवतील.

Leave a Comment