मार्क झुकेरबर्ग निर्माण करणार ‘आयर्न मॅन’सारखा जार्व्हिस

mark
न्यूयॉर्क – फेसबुक कंपनीचा प्रमुख मार्क झुकेरबर्गने घरकामासाठी मदत करणारा कृत्रिम बुद्धिमत्तेचा बटलर निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे. हा बटलर हॉलीवूड हायटेक चित्रपट ‘आयर्न मॅन’मधील जार्व्हिस प्रमाणेच एआय मॅन (आर्टिफिशल इंटेलिजन्स) असेल असे मार्कने सांगितले. घरात मदत करण्यासाठी आपल्याला याची निर्मिती करायची असून २०१६ साठीचे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्याने सांगितले. आपल्या या निर्मितीविषयी त्याने फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Comment