ब्रेड खाणे फायद्याचे की तोट्याचे ?

bread
ब्रेड हा माणसाच्या रोजच्या जेवणाचा हिस्सा बनला आहे. ब्रेड एक असा पदार्थ आहे, ज्याला सर्वजण सकाळ असो वा रात्री कधीही खाणे पसंत करतात. सँडविच आणि अन्य अनेक रुचकर पदार्थ ब्रेडपासून बनविले जातात. पण ब्रेड खाणे हे शरीराला फायद्याचे कि तोट्याचे हे ही जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

विशेष करून मैदाच्या ( पांढरा) ब्रेडमध्ये फायबरची कमी असते, फायबर हे शरीरात आवश्यक पोषकतत्व पोहचवण्यासाठी मदत करतो. ब्रेड आपल्या शरीरात अन्नाची कमतरता भरून काढत नाही. पोषक तत्वांनी युक्त असे भोजन करणे आवश्यक असते. शरीरातील कार्बोहायड्रेटची कमी भरुन काढणारे आणि ऊर्जा प्रदान करणारे अन्न सेवन करणे कधीही चांगले. ब्रेडवर लगेच बुरशी चढण्याची समस्या असल्याने ब्रेड कधीही भाजूनच खावे. ब्रेडमध्ये कार्बोहाइड्रेट, मीठ, तेल, साखर व प्रिजर्वेटिव्स असतात जे वजन वाढवण्याचे काम करतात. जर आपल्याला वजन घटवायचे असेल तर ब्रेड खाणे अगोदर बंद करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment