बॉलीवूडचा महसूल गाठणार १९ हजार कोटींची पातळी

bollywood
मुंबई – आगामी वर्षात म्हणजे २०१६-१७ आर्थिक वर्षात हिदी चित्रपटउद्योगाचा महसूल १९३०० कोटी रूपयांवर जाईल असे असोचेम आणि डिलुईट यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात दिसून आले आहे. एकूण चित्रपट उद्योगातून गोळा होणार्‍या महसूलात बॉलीवूडचा वाटा ७४ टक्के असेल असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.

बॉलीवूड उद्योगनगरीत केले जात असलेले आक्रमक मार्केटिंग, परदेशी बाजारातून असलेली वाढती मागणी व चित्रपटांच्या गुणवत्तेत झालेली सुधारणा यामुळे महसूल वाढीस हातभार लागत असल्याचे सांगितले जात आहे. मल्टीप्लेक्सची वाढत असलेली संख्या तसेच डिजिटलीकरण याचाही महसूल वाढीत वाटा आहे. ऑनलाईन व डिजीटल महसूलात २०१७ पर्यंत १५ टकके वाढ अपेक्षित असताना होम व्हिडीओ महसूलात मात्र १० टक्के घट येईल असेही हा अहवाल सांगतो.

Leave a Comment