दूर राहा ह्दयरोगापासून

heart
आजकल स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती एकदुसऱ्याच्या पुढे जाऊ पाहत आहे. घड्याळाच्या काट्यांमागे धावत असतांना प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच देशात ह्दयरोगांचे प्रमाण वाढत जात आहे.

कामाच्या तणावामुळे आजकाल कोणी ना आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो ना पुरेसा आराम करायला वेळ मिळतो. अशा दगदगीमुळे ह्दयरोग, ह्दयाघात अशा गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. जर काही कारणाने ह्दयाला होणारा रक्तपुरवठा बंद पडला किंवा फार मोठ्या प्रमाणात बंद पडला तर झटक्याने ह्दय बंद पडले त्याला ह्दयविकाराचा झटका असे म्हणतात.

बहुतेक भारतीयांनी आता वेस्टर्न लाइफस्टाईल स्वीकारली आहे. आहारातही बदल झाले आहेत. शारीरिक श्रम कमी झाले आहेत. पण त्यानुसार भारतीयांच्या मेटॅबॉलिझममध्ये चयापचयांच्या प्रक्रियांमध्ये जैविक बदल झालेले नाहीत. भारतीयांच्या रक्तातील इन्शुलिनची सेन्सिटिविटी, संवेदनशीलता खुपच कमी आहे. याचा अर्थ अन्नातून अति प्रमाणात आलेले कार्बोर्हायड्रेट्स, साखरेचे पदार्थ यांच पचन करण्यास भारतीयांमधील इन्शुलिन कमी पडतं. भारतीयांनी मनान पाश्चात्य जीवनशैली स्विाकरली असली तरी भारतीयांच्या जैविक शरीराने ती स्वीकारलेली नाही. त्यामुळे भारतात डायबेटीस, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर यांचे प्रमाण वाढले आहे. भारतात शहरी भागात पायी अथवा सायकलने शाळा-कॉलेजला जाण्याचे प्रमाण खुप कमी आहे. शहरी भारतीय बैठे जीवन जगतात असे जागतिक निरिक्षक सांगतात.

ह्दयविकार टाळण्यासाठी

१. व्यायाम – व्यायामाचे दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे फायदे असतात. दृश्य फायद्यात शरिराचे वजन घटलेले दिसून येते तर अदृश्य फायद्यात शरिराची रोगप्रतिकारशक्ती आणि ताकद वाढते. व्यायामाने शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होते. ह्दयाची गती वाढणे, श्वास्च्छोवास फास्ट होणे, घाम येणे हे उत्तम व्यायाम केल्याचे लक्षण आहे. ह्दयरोग्यांना व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर आर्वजून देतात.

२. आहारात बदल – आपले आरोग्य हे पुर्णपणे आपल्या आहारावर अवलंबून आहे. ह्दयरोग्यांनी आपल्या मनाला आवर घालत आहारात बदल करणे खुप गरजेचे आहे. शहरी भारतीयांच्या आहारात चरबीयुक्त पदार्थ जसे की जंक फुड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.
रक्तातील चरबी कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. माणसाने कमी कॅलरिजचा आहार घ्यावा. आहारात जितक्या कॅलरिज असतील त्या कॅलरीजमधील ५० ते ६० टक्के कॅलरीज फॅट्सपासून मिळाल्या पाहिजेत

३. धुम्रपान – धुम्रपानाने संबंध शरीराला नुकसान पोहोचते. स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये हार्ट डिसीज, लकवा मारणे, पायाच्या आर्टरिज बंद होऊन गँग्रीन होणे असे अनेक रोग होतात. तेव्हा धुम्रपान,तंबाखु, गुटखा बंद करणे हा प्राथमिक प्रतिबंधातील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.

हे टाळा
१, रेड मीट, डेअरी प्रॉडक्टस, जंक फुड, चिप्स, बटाटावडा, बर्गर, पावभाजीसारखे पदार्थ
२. भारतीय मिठाई
३. मद्य आणि शीतपेय
४. कुकिंग मिडियम म्हणून तेल आणि तुपाचा वापर

हे घ्या
१. ताजी फळ, ताजी भाज्या, मोड आलेले कडधान्य, उसळी
२. शेलफिश सोडून इतर मासे

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment