दुसऱ्यांदा करिअरची सुरुवात करताना…

career
काही विशिष्ट कारणामुळे नोकरीपासून जास्त वेळ लांब राहण्याची वेळ बहुतेकांवर येते. अशा वेळेस दुसऱ्यांदा करिअरची सुरुवात करतांना थोडी भीती वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीचा सामना कसा करावा त्यासाठी काही विशेष सल्ला

स्त्री असो वा पुरुष आज प्रत्येकजण आपल्या करिअरविषयी अतिशय जागरुक आहे. लग्नानंतर विशेषतः आई झाल्यानंतर स्त्रियांना आपली नोकरी सोडावी लागते पण मुल मोठे झाल्यावर आपल्या करिअरची सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या महिलांचीही कमी नाही. पुरुषांनाही अनेक वर्षे काम केले ती नोकरी सोडण्याची वेळ येते आणि इतर ठिकाणी उच्च पदावर नोकरी शोधावी लागते. अशावेळेस निराश न होता पून्हा आपले करिअर सुरु करण्यासाठी काही टिप्स खास तुमच्यासाठी

१. आपल्या परिचयाच्या लोकांशी संवाद असू द्या. त्यासाठी तु्म्ही सोशल नेटवर्किंग साईट्सचाही वापर करु शकता. व्यावसायिक मित्रांना सणवार, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आपला खास मित्रांचा आणि व्यावसायिक मित्रांचा नेटवर्क मेन्टेन करा.

२. आपल्या मित्रांचे स्टेटस आणि अपडेट्स लाईक करा. ते आपल्या करिअरसाठी फायद्याचे राहिल. एका वर्षात कमीतकमी एका कॉन्फ्रेंसमध्ये जरुर भाग घ्या. अशा कॉन्फ्रेंसमध्ये असलेल्या व्यावसायिकांद्वारे आपला त्यांच्याशी परिचय होऊन नोकरी मिळण्यास मदत होईल. नवीन परिचित लोकांचा नंबर आणि व्हिजिटींग कार्ड घेण्यास विसरु नका.

३. दिवसातला काही वेळ वाचनासाठी घालवा. मार्केटमध्ये कोणते क्षेत्र करिअरसाठी तेजीत आहे कोणते नाही याचा आढावा घेत रहा.

Leave a Comment