इन्सट्रक्शनल डिजाईनिंगमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

diploma
आज विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अनेक पर्याय उपलब्ध झाले असून खास करुन तरुणींसाठी तर असंख्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे कुठल्या एका विषयाची निवड करावी, अशा संभ्रमात जर तुम्ही असाल, तर आम्ही तुमची समस्या सोडविण्यास मदत करतो.

इन्सट्रक्शनल डिझाईन्स मधील पदव्युत्तर पदवी हा अभ्यासक्रम आपणास व्यावसायिक योग्यता प्रदान करतो. यामध्ये विद्यार्थ्यांना इन्सट्रक्शन डिजाईन-इ-लर्निंग, क्लासरुम ट्रेनिंग आणि प्रात्याक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी १२ महिन्याचा असून, यामध्ये व्यवस्थापन सिद्धांत, शैक्षणिक मानसशास्त्र आणि प्रभावी संवादकौशल्य यासारखे विषय शिकवले जातात. अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क सुमारे १८,००० रुपये आहे.

हा कोर्स सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टेंस लर्निंग कोर्सच्या अंतर्गत असून, इतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो. शिक्षण, ट्रेनिंग, मल्टीमिडीया, व्यवस्थापन आणि ह्यूमन रिसोर्समध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खासगी उद्योगात नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी तसेच व्यापार आणि उद्योग, क्लास सेटिंग्ज करणे, डिजाईन बनवणे आणि मुल्यांकन करणे अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते.

Leave a Comment