लंडन- पिरिऑडिक टेबलला रसायनशास्त्रात अनन्यसाधारण महत्व असून पिरिऑडिक टेबलमधील सातवी ओळ पूर्ण झाली आहे. चार मूलद्रव्यांचा शोध जपान, रशिया आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. त्यामुळे पिरिऑडिक टेबलची सातवी ओळ पुर्ण झाली आहे.
पिरिऑडिक टेबलची सातवी ओळ चार मूलद्रव्यांचा शोधानंतर संपूर्ण
११३, ११५, ११७, ११८ या चार मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अॅँड अप्लाइड केमिस्ट्रीने हे चारही मूलद्रव्य मान्य केले आहेत. ही चार मूलद्रव्ये शोधली गेली आहेत यासाठी आवश्यक ते पुरावे आणि संशोधन रशिया आणि अमेरिकेच्या संशोधकांनी पुरवले आहे. या चारही मूलद्रव्यांना कायम स्वरुपी नाव लवकर देण्यात यावे अशा सूचना रसयानशास्त्रज्ञांनी केल्या आहेत. दरम्यान, या संशोधनांचे भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी स्वागत केले आहे. अतिशय चार महत्वपूर्ण मूलद्रव्यांच्या शोधामुळे रसायनशास्त्र तसेच विज्ञानात भरीव योगदान झाले असल्याचे मत स्वा. रामानंद तीर्थ विद्यापीठातील रसायनशास्त्राचे संशोधक गोपाल तोरडमल यांनी दिले आहे.