बाळ का रडतयं सांगणारे अॅप

baby
अॅपच्या भाऊगर्दीत प्रथमच पालकांच्या मदतीसाठी एक अॅप बाजारात आले आहे. अनेकदा तान्हुली का रडताहेत हे समजत नाही आणि आईवडील त्यांच्या रडण्याने कासावीस झालेले असतात. अशा आईवडीलांसाठी हे अॅप वरदान ठरणार आहे कारण तुमचे लाडके बाळ का रडतय हे अॅप सांगणार आहे. नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी हॉस्पिटल यनलन येथील संशोधकांनी द इनफंट क्राईंग ट्रान्सलेटर नावाचे हे अॅप विकसित केले आहे.

संशोधक सांगतात हे अॅप बाळाची रडण्याची पद्धत ओळखून रडण्यामागचे कारण सांगेल. त्यासाठी बाळ रडायला लागले की त्याचा आवाज रेकॉर्डिंगचे बटण १० सेकंद दाबून रेकॉर्ड करायचा. हा आवाज क्लाऊड ड्राईव्हवर अपलोड केला जातो व १५ सेकंदात बाळाच्या रडण्याचे कारण पालकांना मोबाईलवर दिले जाते. हे अॅप बनविण्यासाठी संशोधकांनी १०० नवजात बालकांचे रडण्याचे २ लाख आवाज रेकॉर्ड केले आहेत. हे अॅप रडण्याचे कारण ४ प्रकारे ओळखू शकते. म्हणजे बाळ भूकेमुळे रडतेय, झोप आल्याने रडतेय, त्याला कांही तरी दुखतेय किंवा डायपर ओला आहे म्हणून रडतेय असे. २ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांबाबत या अॅपने ९२ टक्के करेक्ट रिझल्ट दिले आहेत. मूल मोठे होत जाईल तशी ही अचूकता थोडी कमी होते मात्र तरीही ६ महिन्यांच्या बाळांपर्यंत हे अॅप योग्य ठरेल असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment