फेसबूक वापरणा-या जवानांसाठी लष्कराची नियमावली

facebook
चंदीगड- लष्कराने आता फेसबूक वापरणा-या जवानांवर इशारा दिला असून लष्करामधील अधिकारी व जवान आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या सोशल मिडियाच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एका हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत हवाई दलामधील जवान रणजित के के याला ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही नियमावली काढण्यात आली आहे.

या नियमावलीमध्ये फेसबुकवर अश्लील छायाचित्रे वा व्हिडिओ न पाहण्याचे; तसेच अज्ञात लोकांकडून आलेल्या “फ्रेंड रिक्वेस्ट‘ न स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. फेसबुकवरील एखादी अज्ञात फ्रेंड किंवा अश्लील छायाचित्र लष्कराची संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेला सापळा असू शकतो, असा इशारा या नियमावलीद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, हवाई दलमधील जवान रणजित के के याला गेल्या आठवड्यात फेसबुकवर सुंदर छायाचित्र असलेल्या एका महिलेस भारतामधील हवाई तळांची संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपांतर्गत ताब्यात घेण्यात आले. रणजित याला ब्रिटनमधील पत्रकार वाटलेली ही महिला प्रत्यक्षामध्ये एका परकीय गुप्तहेर खात्याशी संबंधित होती.

Leave a Comment