जुळेच पण जन्मतारखेत १ वर्ष अंतर

judwa
अमेरिकेत नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एक जुळे जन्माला आले आहे. आता जुळे जन्माला आले यात विशेष कांही नसले तरी या जुळ्यांच्या जन्मतारखेत १ वर्षाचे अंतर पडले आहे. ज्यांच्या जन्मात फक्त २ मिनिटांचा फरक पडल्याने ही भावंडे आपला वाढदिवस एकाच दिवशी करू शकणार नाहीत.

मिळालेल्या माहिैतीनुसार कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथे ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वा.५९ मिनिटांनी जेलिनचा जन्म झाला तर तिचा जुळा भाऊ लुईस याने १२ वा.१ मिनिटाने जन्म घेतला. केवळ दोन मिनिटांच्या फरकाने ज्यांची जन्मतारिखच बदलली नाही तर वर्षही बदलले आहे. त्यांच्या पालकांना आपल्याला जुळे होणार आहे हे आधी माहिती होतेच पण ते एकाच दिवशी जन्माला येतील व त्यांचा वाढदिवस एकत्रच साजरा करता येईल असे त्यांना वाटत होते. मात्र दोन वाढदिवस करायला लागले तरी मुले स्वस्थ आहेत याचा आनंद पालकांना अधिक वाटतो आहे.

Leave a Comment