गेल्या २ वर्षात १ रूपयाच्या १६ कोटी नोटांची छपाई

rupee
मुंबई- अर्थमंत्रालयाने गेल्या दोन वर्षांच्या काळात १ रूपया किंमतीच्या १६ कोटी नोटा छापल्या असल्याचे आरटीआय नुसार मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे. दिल्लीतील आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल व मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन राय यांनी ही माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानी गेल्या २० वर्षात १ रूपये किमतीच्या किती नोटा चलनात जारी झाल्या याची माहिती मागविली होती.

करन्सी नोट प्रेसचे पीआरओ जी कृष्ण मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार १९९४-९५ मध्ये १ रूपया किंमतीच्या ४ कोटी नोटा जारी केल्या गेल्या होत्या मात्र त्यानंतर १९९५-९६ पासून २०१३-१४ पर्यंत या नोटांची छपाई बंद होती. त्यानंतर २०१४-१५ मध्ये ५० लाख व आत्तापर्यंत १५.५ कोटी इतक्या १ रूपयांच्या नोटा जारी केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर या नोटा सरेआम वेबसाईटवर ५० रूपयांला १ याप्रमाणे विकल्या जात असून त्यावर रिझर्व्ह बॅकेने नियंत्रण आणले पाहिजे असेही ते म्हणाले.

Leave a Comment