आता बँकेतील कारकुनाच्या नोकरीसाठी गरज नाही मुलाखतीची

interview
नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व बँकांना सरकारी बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कारकुनपदासाठी यापुढे मुलाखती घेऊ नयेत, असे आदेश दिले आहेत.
सरकारी कार्यालयात कनिष्ठ पदांवर भरती करताना मुलाखतीची आवश्यकता नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखती घेऊ नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या मुलाखतीवर बंदी आणण्याचा निर्णय एक जानेवारी २०१६ अंमलात आला.

मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लेखी परीक्षेच्या जोडीला मानसिक चाचणी तपासण्यासाठी पर्याय शोधावा, असे आदेश केंद्रीय वित्त विभागाने सार्वजनिक बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध सचिवांची बैठक झाली होती. त्यात बँकांनी कनिष्ठ पदांवर मुलाखती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

३१ डिसेंबर २०१५ मध्ये कारकून व तत्सम परीक्षा झाली. या परीक्षेत उत्तीर्ण होणा-या उमेदवारांना भरती करण्यापूर्वी त्यांच्या मुलाखती घेऊ नये. मात्र, मुलाखतीला पर्याय म्हणून उमेदवारांची मानसिक चाचणी व कौशल्य जाणणे आवश्यक राहणार आहे. या चाचण्या घेताना केवळ त्यांचे मूल्यांकन करायचे आहे. या चाचण्यांना गुण देऊ नयेत, असे केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले.

Leave a Comment