नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या प्रारंभी आय्वरी एम४ हा ८ मेगापिक्सल कॅमे-याचा नवीन फ्लॅगशीप टॅबलेट स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘लावा’ने लाँच केला आहे. आकर्षक लूक असलेल्या या टॅबलेटची किंमत ९,२९९ रूपये आहे.
लावाने लाँच केला आय्वरी एम४ टॅबलेट
कसा आहे लावाचा नवा टॅबलेट – याचा डिस्प्ले ८ इंचाचा आयपीएस असून त्याचे रिझोल्यूशन १२८०३ x ८०० पिक्सल एवढे असून यात लॉलीपॉप अँड्रॉईड ५.१ ऑपरेटींग सिस्टिम देण्यात आले आहे. त्याचबरोबर १.३ गीगाहर्टज् क्वॉडकोरचा प्रोसेसर देखील यात आहे. यात २ जीबी डीडीआर ३ रॅम असून १६ जीबी इंटरनल स्टोअरे देखील देण्यात आले आहे. याचा रियर कॅमेरा ८ मेगापिक्सल एचडी व सेल्फी कॅमेरा ३.२ मेगापिक्सलचा आहे. यात ३जी, यूएसबी, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ, जीपीएस अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता ४००० एमएएच एवढी आहे. हा टॅबलेट सिल्व्हर, डार्क ग्रे रंगात उपलब्ध आहे.