राजकारणी आणि अधिकाऱ्यांची वैज्ञानिक क्षेत्रातील लुडबुड बंद करू – मोदी

modi
म्हैसूर – राजकारणी आणि अधिकाऱ्यांची वैज्ञानिक क्षेत्रात होणारी होणारी लुडबुड बंद करून, या क्षेत्रातील निर्णयप्रक्रिया वैज्ञानिकांच्याच पातळीवर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर विद्यापीठात १०३ व्या भारतीय सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी सुतोवाच केल्यामुळे निर्णय घेताना होणार विलंब टाळून वैज्ञानिकांना अधिक परिणामकारकपणे काम करण्यास मदत होणार आहे.

तसेच त्यांनी संशोधन क्षेत्रासाठी अधिकाधिक निधीची तरतूद करून संशोधनाला चालना देणार असल्याचेही यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पर्यावरण आणि शहरीकरण यांच्यात समतोल साधण्यासाठी करावयाच्या प्रयत्नाकडेही वैत्रानिकांचे लक्ष वेधले. पाच दिवस चालणाऱ्या या सायन्स काँग्रेससाठी देशभरातून १५ हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Leave a Comment