कावासाकीने त्यांची २०१६ व्हल्कन १७०० व्हायेजर एबीएस ही दणकट आणि आकर्षक मोटरसायकल पेश केली असून तिची अमेरिकेतील किंमत १७३९९ डॉलर्स इतकी आहे. पाहताक्षणीच या टूअरर बाईकची ताकद ग्राहकांना समजू शकेल असा कंपनीचा दावा आहे.
कावासाकीची व्हल्कन १७०० व्हॉयेजर एबीएस
या बाईकला १७०० सीसीचे दणकट इंजिन दिले गेले आहे. फोर स्ट्रोक,५२ व्ही ट्विन, लिक्विड कूल असे हे इंजिन ६ स्पीड ट्रान्समिशनने जोडलेले आहे. फ्रंटमध्ये ४५ एमएएन हायड्राॅलिक फोर्क सस्पेन्शन, ब्रेकींग फ्रंटमध्ये ड्यूल ३०० एमएम डिस्क ब्रेक्स तर रियरमध्ये ३०० एमएम सिगल डिस्क ब्रेक्स दिले गेले आहेत. रायडरला या बाईकचा उत्तम अनुभव मिळेल असाही कंपनीचा दावा आहे. भारतात या बाईकची किंमत किती असेल ते समजू शकलेले नाही.