मुलांची उत्सुकता शमविणारे सर्च इंजिन ‘थिंगा’

thinga
वॉशिंग्टन: लहान वयात मुलांमध्ये जगातील विविध गोष्टींबद्दल उत्सुकता असते. त्यांच्या शंकांना उत्तरे देताना पालकांच्या नाकी नऊ येतात. मात्र मुलांच्या या शंका दूर करणारे ‘थिंगा’ हे सर्च इंजिन विकसित करण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे प्राथमिक शाळेत जाण्याच्या वयातील विद्यार्थ्याच्या सर्व प्रकारच्या शंकांची उत्तरे या सर्च इंजिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईटवर मुलांसाठी व्हिडिओ, कूल, अॅनिमल्स, एंटरटेन्मेंट, लर्न आणि लाईफ असे विभाग आहेत.

या वेबसाईटवर ‘ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्ट’नुसार आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था आणि ‘पेरेंटल कंट्रोल’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या हे सर्च इंजिन केवळ वेबसाईट स्वरूपात उपलब्ध असले तरीही ते मोबाईलवरून पाहता येते. लवकरच त्याचे ‘अॅप’ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Comment