प्लुटोची अनेक गुपिते सांगणारे आणि बाह्यग्रहाच्या शोधाचे वर्ष

new-horizon
वॉशिंग्टन : नासाच्या न्यू होरायझन्स यानाने दशकभराच्या प्रवासानंतर यंदाच्या वर्षी प्लुटोचा घेतलेला छायाचित्रांच्या माध्यमातील वेध महत्त्वाचा ठरला. बटू ग्रह असला तरी तेथे आपल्या सौरमालेची एक वेगळी कहाणी दडलेली आहे. या वर्षांने आपल्या हवाली सेरेस, मंगळ व शनीच्या चंद्रांची काही गुपितेही केली. विश्वात दूरवर असलेले अनेक बाह्यग्रह शोधण्यात मदत झाली. नासाच्या न्यू होरायझन्स यानाने प्लुटोची ७८०० मैल अंतरावरून जी छायाचित्रे घेतली त्यातून त्याचा बर्फाळ पृष्ठभाग दिसून आला. प्लुटोचा शोध लावणारे क्लाईड टॉमबॉग यांच्या नावाने त्या ग्रहावर असलेल्या टॉमबॉग प्रदेशाचे दर्शन घडले. हृदयाच्या आकाराचा हा भाग आहे.

भूगर्भशास्त्रीय दृष्टीने तो अजून क्रियाशील आहे. तो निष्क्रिय असल्याचे या पूर्वी सांगण्यात आले होते. तेथील पृष्ठभागाची रचना बर्फाने बदलून टाकली आहे. न्यू होरायझन्सने वैज्ञानिकांना या ग्रहाचा आकार नेमका किती आहे याची माहिती दिली. त्याच्या विषूववृत्तावर कुठलाही फुगवट्यासारखा भाग नसल्याचे निश्चित झाले. प्लुटोचा चंद्र असलेला शॅरॉन फारसा तरुण नाही; पण त्याचा उत्तर ध्रुव लालसर रंगाचा आहे तेथे प्लुटोइतके पर्वतही नाहीत. २०१६ च्या उन्हाळ्यापर्यंत प्लुटोचा हा शोध सुरूच राहणार आहे. त्यानंतर न्यू होरायझन्स यान कुईपर पट्ट्यात जाईल.मंगळावर खा-या पाण्याचे प्रवाह असून तेथे उतारावर हायडड्ढेटेड क्षार आहेत व तापमान कमी असून वातावरण विरळ आहेत, असे सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आले त्यामुळे मंगळावर पाणी वाहात होते याचे पुरावे मिळाले आहेत.

गरम हवामानातच या ख-या पाण्याच्या खुणा २०११ मध्ये सापडल्या होत्या त्याचे स्पष्टीकरण या वर्षी मिळाले. मंगळावर अलीकडेच दरडी कोसळल्याचे छायाचित्रही नासाने पाठविले आहे. भारताच्या मंगळ मोहिमेला या वर्षी वर्ष पूर्ण झाले. नासाच्या केप्लर दुर्बीणीने जुलत पृथ्वीसारखे ग्रह शोधून काढले. त्यात केप्लर ४५३ बी या पृथ्वीपेक्षा खडकाळ ग्रहाचा समावेश असून तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे. पृथ्वी सूर्याभोवती ज्या अंतरावरून फिरते त्याच अंतरावरून तो त्याच्या मातृ ता-याभोवती फिरत असून पृथ्वीपेक्षा त्याचा व्यास ६० टक्के जास्त आहे. त्याचा मातृ तारा सूर्यापेक्षा जुना आहे. नासाच्या डॉन या यानाने सेरेसला भेट दिली तो लघुग्रहांच्या पट्ट्यात असून बर्फाच्छादित आहे. त्यावर ठळक ठिपके असून ते बर्फ व क्षारांचे आहेत. तेथे पिरॅमिड नावाचा पर्वत आहे.

Leave a Comment