जागतिक बॅंक देणार अल्पसंख्यांकाच्या कौशल्य विकासासाठी कर्ज

world-bank
नवी दिल्ली- जागतिक बँकेने भारतातील अल्पसंख्यांकाच्या उन्नतीसाठी ५० दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचे घोषित केले असून यासाठी भारतातील नई मंझिल या संस्थेसोबत जागतिक बँकेने करार केला आहे.

त्यानुसार जागतिक बँक आपले कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या संस्थांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे. आपले व्यावसायिक कौशल्य विकसित करणे तसेच मुक्त शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हे कर्ज हे दीर्घ मुदतीचे कर्ज असणार आहे असे जागतिक बँकेने सांगितले आहे.

Leave a Comment