आता हाताच्या इशा-यावर चालणार बीएमडब्ल्यू

bmw-seden
नवी दिल्ली : आपण आजवर टच स्क्रीन आणि आवाजावर सुरु होणाऱ्या कार बाबत ऐकले आहे. पण आता हाताच्या इशाऱयावर चालणारी कार बाजारात येणार असून बीएमडब्ल्यूच्या ‘सिडान’ या कारमध्ये ही सुविधा असणार आहे.

ही सुविधा एयरटचच्या नवीन टेक्नीकमुळे देणे शक्य आहे. लॉस वेगास येथे पुढच्या महिन्यात हे नवीन फीचर येणार आहे. कंपनीचे अधिकारी म्हणाले, यामध्ये टच स्क्रीन सारखीच सुविधा देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये टच न करता केवळ हातांच्या इशा-यावर गाडी आपले ऐकणार आहे. ड्रायवर सीटच्या समोरच ही स्क्रीन असून, त्याच्यासमोर हात नेताच फीचर काम करायला सुरू होईल.

Leave a Comment