आजपासून बदलल्या या १० गोष्टी

[nextpage title=”आजपासून बदलल्या या १० गोष्टी”]
collarge
नवीन वर्ष मोठ्या दिमाखात आले आहे. कसे असेल हे वर्ष ? या वर्षात काय काय बदलेल याबाबत आत्ताच कांही सांगता येणार नसले तरी आजपासून म्हणजे नव वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हे कांही बदल नक्कीच झाले आहेत. अर्थात त्यातील कांही बदल नक्कीच चांगले आणि आनंददायी आहेत तर कांही थोडा हिरमोड करणारेही आहेत. पण गोडाबरोबर कांही कडू असले म्हणजे जीवनाचा समतोल राखला जातो हेही खरे. त्यामुळे झालेले बदल हे आपल्याच भल्यासाठी आहेत याची खात्री बाळगायची आणि नवीन वर्षाला सामोरे जायचे. बघू या तरी काय काय बदललेय आजच्या १ जानेवारीला?[nextpage title=”१)सातवा वेतन आयोग लागू”]
7th-pay
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ही नककीच खूषखबर. आजपासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. पगारवाढीमुळे महागाईचे चटके थोडे कमी बसतील अशी आशा या वर्गाला करायला हरकत नाही.[nextpage title=”२)एलपीजी सबसिडी”]
subsidy
ज्या नागरिकांचे करपात्र उत्पन्न १० लाखांहून अधिक आहे, त्यांना आजपासून एलपीजीवर मिळत असलेली सबसिडी मिळणार नाही. मोदी सरकारने सत्तेवर आल्याबरोबरच ज्यांना शक्य आहे, त्यांनी एलपीजी सबसिडी नाकारावी असे आवाहन केले होते. त्याला थोडा फार प्रतिसादही मिळाला. मात्र अखेर आता श्रीमंत नागरिकांसाठी ती कायद्याने बंद करण्याचे पाऊल सरकारला उचलावे लागले.[nextpage title=”३)कॉल ड्राॅप भरपाई”]
call
मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना आजपासून कॉल ड्राॅप झाल्यास ग्राहकाला १ रूपया भरपाई द्यावी लागणार आहे. कॉल ड्राॅपचे प्रमाण इतके प्रचंड वाढले होते की त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. नुकसान होत होते ते वेगळेच. आता मात्र भरपाई द्यावी लागणार असल्याने मोबाईल सेवा पुरवठादार त्यांची सेवा सुधारतील अशी आशा करायला हरकत नाही.[nextpage title=”४)ऑड इव्हन फॉर्म्युला”]
oddeven
ही आज फक्त दिल्लीकरांची डोकेदुखी असली तरी भविष्यात अनेक शहरवासियांना त्याला सामोरे जावे लागेल असा अंदाज आहे. आजपासून राजधानी दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी हा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. त्यानुसार ऑड तारखांना ऑड नंबरप्लेटची वाहने व सम तारखांना इव्हन नंबर प्लेटची वाहने रस्त्यावर आणता येणार आहेत. अर्थात त्यातून व्हीव्हीआयपी व महिलांना सूट दिली गेली आहे.[nextpage title=”५)एसबीआयचे सेवा दर वाढले”]
sbi
भारतातील अग्रणी स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून त्यांच्या अनेक सेवांवरील दरात वाढ केली आहे. लॉकर व अकौंट देखभाल, वाहन कर्ज, गृह कर्ज, प्रोसेसिंग फी इतकेच नव्हे तर खाते बंद करण्याचे सेवा दरही आजपासून वाढले आहेत.[nextpage title=”६)मुलाखतीविनाच नोकरी”]
jobs
मोदी सरकारने आजपासून सरकारी नोकरीतील ब, क व ड पदांसाठी इच्छुकांना मुलाखतीच्या त्रासातून सुटका दिली आहे. ही घोषणा आक्टोबरमध्येच केली गेली होती मात्र त्याची अम्मलबजावणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू झाली.[nextpage title=”७) पॅन कार्ड”]
pan-card
कॅशलेस ट्रान्झॅक्शन वाढविण्यासाठी आता दोन लाखांवरील खरेदी विक्री करताना पॅन कार्ड असणे अनिवार्य केले गेले असून त्याची अम्मलबजावणी आजपासून सुरू झाली. कॅशकार्ड अथवा प्री कार्डवर ५० हजारांहून अधिक रकमेची खरेदी करतानाही पॅनकार्ड लागणार आहे तसेच नवीन बँक अकौंट उघडताना पॅन कार्ड अनिवार्य केले गेले आहे.[nextpage title=”८)यूएएन आवश्यक”]
uan
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यंना यापुढे फंडाशी संबंधित कोणतेही ट्रान्झॅक्शन करताना युनिव्हर्सल अकौंट नंबर असणे अनिवार्य झाले आहे. निर्वाह निधीचा क्लेम सेटल करतानाही हा नंबर आवश्यक आहे.[nextpage title=”९)तामिळनाडूतील मंदिरप्रवेशासाठी ड्रेस कोड”]
dresscode
मद्रास हायकोर्टाचा आदेश लागू करताना तमीळनाडू सरकारने तेथील मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू केला असून त्याची अम्मलबजावणी १ जानेवारीपासून होणार आहे. यापुढे येथील मंदिरात प्रवेश करताना पाश्चात्य कपडे परिधान करता येणार नाहीत. महिलांना साडी अथवा सलवार कमीझच घालावा लागणार आहे. तोकडे कपडे., जीन्स चालणार नाहीत.[nextpage title=”१०) मर्सिडीज महागल्या”]
mercedese
सर्वसामान्यांना मर्सिडीज महागल्या काय किंवा स्वस्त झाल्या काय फारसा फरक पडणार नसला तरी माहिती असावे म्हणून हे सांगत आहे की आजपासून मर्सिडीजने त्यांच्या गाड्यांच्या किंमती वाढविल्या आहेत. भारतातही ही किमतवाढ लागू झाली आहे.

1 thought on “आजपासून बदलल्या या १० गोष्टी”

Leave a Comment