शाओमीने लाँच केला ७० इंचाचा स्मार्ट टीव्ही

xiaomi
मुंबई: यंदा स्मार्टफोन नव्हे तर टीव्ही स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली चीनी कंपनी शाओमीने लाँच केला असून शाओमीने टीव्ही ३ सीरीजमध्ये तब्बल ७० इंच ४के डिस्प्लेचा टीव्ही लाँच केला आहे.

चीनमध्ये लवकरच या टीव्हीची विक्री सुरु होणार आहे. या टीव्हीची किंमत ९९९९ युआन (१,०२,२५० रुपये) आहे.याआधी शाओमीने ऑक्टोबर महिन्यात ६० इंचीचा एमआय टीव्ही ३ लाँच केला होता. ज्याची किंमत ४९९९ चीनी युवान (५१,००० रु.) होती.

शार्प कंपनीचा ४के डिस्प्ले ७० इंच एमआय टीव्ही ३मध्ये असून ज्याचे रिझ्युलेशन ३८४०×२१६० पिक्सल आहे. यामध्ये १७० डिग्री व्हुइंग अँगल असणार आहे. या टीव्हीमध्ये ८५ टक्के एनटीएससी कलर गॅमेट आणि १२० हर्त्झ रिफ्रेश रेट असणार आहे. यात १.४ गीगीहर्त्झ क्वॉड कोअर एमस्टार ६ए९२८ प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी माली-७६० एमपी४ जीपीयू आणि २ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज

या स्मार्ट टीव्हीमध्ये ब्ल्यूटूथ ४.१ एलई, वाय-फाय आणि मायक्रो यूएसबी, यूएसबी ३.० आणि इंटरनेट पोर्ट असणार आहे. तसेच २.५ इंच फूल रेंज स्पीकर यात असणार आहे.

Leave a Comment