‘मायक्रोसॉफ्ट’कडून नववर्षाला ‘सेल्फी अॅप’ची भेट

microsoft-selfie
वॉशिंग्टन: सध्या युवावर्गात ‘सेल्फी’चे ‘वेड’ वाढत असताना ‘मायक्रोसॉफ्ट’ नव्या वर्षात आपल्या ग्राहकांसाठी ‘सेल्फी अॅप’ची भेट घेऊन आले आहे. मात्र सध्या तरी हे ‘अॅप’ केवळ ‘आयओएस’ सिस्टीम वापरणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. ‘अँड्रॉईड’साठी हे ‘अॅप’ कधी खुले होणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही.

या ‘सेल्फी अॅप’मुळे सेल्फीची गुणवत्ता वाढविली जाते. प्रकाश, रंगाचे संतुलन आणि त्वचेचा रंग यांचे संतुलन साधण्याचे काम हे ‘अॅप’ करते. या ‘अॅप’मध्ये १३ प्रकारचे ‘फोटो फिल्टर्स’ आणि ‘अॅटोमॅटिक एक्स्पोजर’, ‘नॉइस रिडक्शन’, ‘इंटेलिजंट एन्हान्स्मेंट’ या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘सेल्फी’ उत्तम येण्यासाठी या ‘अॅप’मध्ये वापरकर्त्याचे वय आणि लिंग याचा विचारही केला जातो.

या ‘अॅप’द्वारे फ्रंट किंवा रेअर कॅमेऱ्याद्वारे ‘सेल्फी’ काढता येईल; तसेच स्टोअरेजमधील छायाचित्र ‘एडीट’ करता येईल.

Leave a Comment