चीनने अतिशय विनाशकारी रेलकार मिसाईलची चाचणी यशस्वीरित्या घेतली असून हे दीर्घ पल्ल्याचे मिसाईल अमेरिकेतील कोणतेही लक्ष्य भेदण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. हे मिसाईल दुहेरी मारा करू शकते आणि रेलकारचे हायस्पीड प्लॅटफॉर्म या मिसाईलला आणखी विध्वंसक बनवू शकतात असेही समजते.
चीनच्या रेलकार मिसाईलची चाचणी यशस्वी
शत्रूला गाफील ठेवण्यासाठी ही सिस्टीम पॅसेजर ट्रेनच्या रूपात वापरता येते तसेच मिसाईल लोड करताना ती भुयारांसारखा न दिसणार्या ठिकाणांवर नेऊनही लोड करता येते. रक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल यांग यजन यांनी चीन सीमेवर या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे जाहीर केले असून या डीएफ ४१ मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकेतील कोणतेही ठिकाण येऊ शकते असेही स्पष्ट केले आहे.