नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली जागतिक आर्थिक मंदी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीत झालेली घट ही नव्या वर्षातील मुख्य आव्हाने असल्याचे मत व्यक्त केले आहे.
गुंतवणूकीत झालेली घट नव्या वर्षातील मुख्य आव्हान – अरुण जेटली
अर्थमंत्री जेटली यांनी म्हटले की, २०१५ वर्ष संपले आहे. अर्थव्यवस्थेला चालविणारे सध्याचे इंजन देखील कायम राहणार आहे. तसेच अर्थव्यावस्थेला खालच्या स्तरावर घेऊन जाणारे जागतिक अर्थव्यवस्था, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीतील घट आणि कृषि हे तिन घटक आहेत. डिसेंबरमधील मध्यावधी आर्थिक समीक्षेत सकल घरगुती उत्पादनतील वृद्धी दराच्या अंदाज कमी करून अर्थमंत्रालयाने ७.७.५ टक्के केला होता. याआधी फेब्रुवारीमधील आर्थिक समीक्षेत वृद्धि दर ८.१ ते ८.५ टक्के राहण्याचा अंदाज लावण्यात आला होता. यावरून जेटलींनी म्हटले की, जर देशातील शेती उत्पादन चांगले राहिले तर जीडीपी आणि इतर क्षेत्रावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. अर्थव्यवस्थेला वृद्धिसाठी अनेक इंजिनांची आवश्यकता आहे. खाजगी क्षेत्र देखील एक इंजिन आहे. शिवाय कृषि क्षेत्र देखील इंजिन आहे. जे आजमितीला बिकट अवस्थेत आहेत. त्यामुळे आपणास इतर इंजिनांवर अवलंबून राहावे लागत आहे. तेलाच्या उतरलेल्या किंमती आणि सार्वजनिक क्षेत्रातील वाढता खर्च या सकारात्मक बाबी आहेत. भारतासाठी तेलाच्या किंमती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच आम्ही सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करू शकत आहोत.