२०१७ पासून सुरू होणार पोस्ट बँक

post-bank
नवी दिल्ली – भारतीय टपाल खात्याने आपल्या पेमेंट बँकसाठी देण्यात येणा-या सेवांचा प्राधान्यक्रम निश्चित केला असून पोस्टल बँक ऑफ इंडियाच्या नावाने सुरू होणारी ही बँक सुरुवातीला प्रमुख ४ सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहे. याच्या माध्यमातून ग्राहकाला सरकारी पेमेंट, बिल पेमेंट, नवीन व्यावसायासाठी चालू खाते या स्वस्त आणि प्रगत सेवा देण्यात येणार आहेत. पोस्टल बँक २०१७ पासून सुरू करण्यात येणार आहे.

मार्च २०१७ पासून केंद्र सरकारची पोस्टल बँक ऑफ इंडिया सुरू करण्याची योजना असून यासाठी आवश्यक असणा-या मान्यता सरकारी स्तरावर लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. टपाल खात्याने तयार केलेल्या योजनेनुसार सुरुवातीला पोस्टल बँक चार प्रमुख सेवांवर लक्ष केंद्रित करणार असल्यामुळे लहान उद्योजक, स्थलांतरित कामगार आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजने अंतर्गत जोडले गेलेल्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे.

याबाबत टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पोस्टल बँकेला पेमेंट बँकच्या स्वरुपात परवाना मिळाला आहे. याच्या अंतर्गत आमचे लक्ष्य लहान उद्योजकांकडे असणार आहे. सुरुवातीला बँक विभिन्न मंत्रालय आणि विभागांद्वारा करण्यात येणारे पेमेंट डीबीटी योजने अंतर्गत देणार आहे.

Leave a Comment