जागतिक ब्रँडच्या उत्पादनाची विक्री करणार फ्लिपकार्ट

flipkart
बंगळूरू – आंतरराष्ट्रीय ब्रँडला भारतामध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने नवीन ब्रँड परवाना प्रक्रिया सुरू केली असून जास्त विश्वसनीय बँडेड उत्पादने या प्रक्रियेमुळे ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकराचा पहिलाच करार ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये करण्यात आला आहे.

तीन मोठे ब्रँड टीनऐज म्युटेंट निंजा टर्टल्स, स्पॉनगबोब स्क्वेयरपेंट्स आणि पीनट्स यांच्या परवान्यासाठी फ्लिपकार्टने वायकॉम १८ सह करार केला आहे. वेगवेगळ्य़ा श्रेणीसह जागतिक ब्रँड भारतामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. ब्रँडची संख्या वाढल्यामुळे भारतामध्ये ग्राहकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होईल, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.

या ब्रँडच्या समोर सर्वात मोठे आव्हान किरकोळ विक्रीमध्ये बनावट आणि पारदर्शकता कमी असल्याचे आहे. या आव्हानाला फ्लिपकार्टच्या सक्षम प्रणालीमुळे रोखता येऊ शकते. या प्रक्रियेमध्ये उत्पादनाच्या दर्जाकडे लक्ष्य देण्यात येणार आहे.

Leave a Comment