मायक्रोसॉफटने यांचा नोकिया २३० ड्युअल सिम फिचर फोन भारतात लाँच केला असून या फोनवर इंटरनेट वापरता येणार आहे. गतमहिन्यातच मायक्रोसॉफटने नोकिया २३०, नोकिया २३० ड्युअल सिम फिचर फोन लाँच केले जात असल्याची घोषणा केली होती. त्यातील नोकिया २३० अजून लाँच केला गेलेला नाही. ड्युअल सिमची किंमत ३८६९ रूपये ठेवली गेली आहे.
नोकिया २३० ड्युअल सिम फिचर फोन लाँच
या फोनचे मुख्य आकर्षण आहे कॅमेरा. या फोनसाठी २ एमपीचे रियल व फ्रंट कॅमेरे एलईडी फ्लॅशसह दिले गेले आहेत. नोकिया सिरीज ३० प्लस ओएसवर हा फोन चालेल. त्याला २.९ इंची एलसीडी डिस्प्ले, मेमरी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविता येणारी मेमरी सुविधा, अॅापेरा मिनी ब्राऊझर, एमएसएन डिस्प्ले, ऑडिओ जॅक, २३ तास टॉकटाईम,२२ दिवसांचा स्टँड बाय टाईम देणारी बॅटरी अशी फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी जीपीआरएस, एज, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी अशी ऑप्शन्सही आहेत. हा फोन ग्लॉसी ब्लॅक व व्हाईट कलरमध्ये उपलब्ध असून तो कंपनीच्या अधिकृत स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे.
———