झोलोचा १३ मेगापिक्सलवाला झोलो वन एचडी लाँच

xolo
नवी दिल्ली : १३ मेगापिक्सल कॅमे-याचा झोलो वन एचडीआर हा नवीन स्मार्टफोन मोबाईल निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी झोलोने लाँच केला आहे. ऍमेझॉन या ऑनलाईन वेबसाईटवर ४७७७ रूपयांत या फोनची विक्री सुरू करण्यात आली आहे.

कसा आहे झोलोचा वन एचडी – डिस्प्ले : 5 इंच फुल एचडी आणि १२८० x ७२० पिक्सल रिझोल्यूशन, ऑपरेटींग सिस्टिम : अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप, प्रोसेसर : १.३ गीगाहर्टज् क्वॉडकोर, रॅम : १ जीबी, स्टोअरेज : ८ जीबी इंटरनल, कॅमेरा : १३ मेगापिक्सल रियर, ५ मेगापिक्सल फ्रंट, २३०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि हा फोन सफेद रंगात उपलब्ध आहे. यात ३जी, वायफाय, ब्ल्यूटयूथ, मायक्रो यूएसबी, जीपीआरएस कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आली आहे.