मुंबई – देशाच्या चलनी नोटांवर आगामी काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांच्याही प्रतिमा दिसतील अशी शक्यता व्यक्त केली जात असून म.गांधींसोबतच या महापुरूषांच्या प्रतिमाही चलनी नोटांवर छापल्या जाव्यात असा प्रस्ताव प्रसिद्ध अर्थतज्ञ, नॅशनल अॅडव्हाईस कॉन्सिलचे सदस्य व प्लॅनिंग कमिशनचे माजी सदस्य नरेंद्र जाधव यांनी मोदी सरकारला सादर केला आहे. जाधव हे नॅशनल कमिटीतील ६ बिगरसरकारी सदस्यांतील एक आहेत. तसेच ते काँग्रेसला अधिक जवळचे मानले जातात.
चलनी नोटांवर आंबेडकर, विवेकानंद ?
नरेंद्र जाधव यांनी अ्रसा प्रस्ताव मोदी सरकारला सादर केल्याच्या बातमीला दुजोरा देताना सांगितले की अमेरिका, ब्रिटनमधील चलनी नोटांवर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिमा असतात. भारतातही ते शक्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ होते तसेच रिझव्हॅ बँकेच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे. स्वामी विवेकानंद यांचे एकूण भारत देशाच्या घडणीतच मोठे योगदान आहे. त्यामुळे म.गांधी यांच्याप्रमाणेच या दोन महापुरूषांच्या प्रतिमा नोटांवर छापल्या जाव्यात असे वाटते. १९९६ पूर्वी म.गांधींशिवाय अशोक स्तंभाची प्रतिमाही नोटेवर होती. मात्र आता या नोटाही चलनातून गेल्या आहेत.