२०१५ च्या भारतीय बाजारात टॉप टेन कार्स

[nextpage title=”२०१५ च्या भारतीय बाजारात टॉप टेन कार्स “]
collarge
भारतीय बाजारात ऑटो इंडस्ट्रीसाठी २०१५ चे वर्ष तसे चांगले गेले आहे. या वर्षात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार्स भारताच्या बाजारात सादर केल्या. त्यात विदेशी कंपन्यांनी बाजी मारली असली तरी मारूती सुझुकीने ही त्यांच्याशी तगडी स्पर्धा केल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षात कांही कार्सनी बाजारावर वर्चस्व गाजविले आणि ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच टॉप टेन कार्सची ही माहिती [nextpage title=”१)रेनॉल्डची क्विड”]
kwid
मारूतीच्या अल्टोला स्पर्धा म्हणून बाजारात आलेल्या रेनॉच्या क्विडने ग्राहकांची चांगलीच पसंती मिळविली आणि खर्‍या अर्थाने अल्टोला आव्हान दिले. एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये ही कार फारच यशस्वी ठरली.तिचा एसयूव्ही सारखा लूक आणि स्टाईल ग्राहकांना फारच भावली. ही कार २.५७ लाखांपासून ३.५३ लाखांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.[nextpage title=”२)फोर्ड फिगो”]
figo
फोडने हचबॅक सेगमेंटमध्ये सादर केलेली ही कारही ग्राहकांची पसंती ठरली. ब्ल्यू टूथ टेकनिक्स, यूएसबी यासारख्या आधुनिक फिचर्स तिच्यात मौजूद आहेत. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेल्या या कारच्या किमती ४.३० लाखांपासून ७.४१ लाखांपर्यंत आहेत.[nextpage title=”३)होंडा जॅझ”]
jazz
या कारचे पहिले मॉडेल ग्राहकांची फारशी पसंती मिळवू शकले नव्हते मात्र हे नवीन मॉडेल ग्राहकांना आकर्षित करण्यात चांगलेच यशस्वी ठरले आहे. होंडाने हे नवे मॉडेल तुलनेने खूपच लवकर बाजारात आणले. या कारची किमत ५.३५६ लाखांपासून ते ८.६३ लाखांपर्यंत आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध करून दिली गेली आहे.[nextpage title=”४)मारूती बलेनो”]
baleno
हचबॅक क्षेत्रीतील ही कार मारूतीने बाजारात पेश केली. या कारला मारूती स्विफ्ट चे इंजिन लावले गेले आहे. तिच्या किमती ४.९९ लाखांपासून ते ८.११ लाखांपर्यंत आहेत.[nextpage title=”५)फोर्ड फिगो अस्पायर”]
aspire
सेदान सेगमेंटमध्ये सादर केलेल्या या कारलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बाजारात हलचल निर्माण करण्यात ही कार यशस्वी झाली आहे. तिच्या किमती ४लाख ९० हजारांपासून ८लाख २५ हजारांपर्यंत आहेत.[nextpage title=”६)महिंद्र टीयूव्ही ३००”]
tuv300
फोर मीटर सेगमेंटमधील ही गाडी ६ लाख ९८ हजारांपासून ते ९ लाख २० हजार रूपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असून तिलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिंद्राच्या डस्टरप्रमाणेच ही गाडीही यशस्वी ठरली आहे.[nextpage title=”७)ह्युंदाई क्रेटा”]
creta
इंडियन कार ऑफ द इयर म्हणून गौरविली गेलेली ही कार बाजारात चांगलीच धूम माजविते आहे.एलिट आय २० व आय २० यशस्वी ठरल्यानंतर हयुदाईने त्यांचे लक्ष याच कारवर केंद्रीत केले होते. आधुनिक फिचर्ससह असलेली ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिच्या किमती ८ .६९ लाखांपासून १३.६० लाखांपर्यंत आहे.[nextpage title=”८)व्होल्व्हो एक्ससी ९०”]
volvo
ही एसयूव्हीही ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे. ही सात सीटर कार लग्झरी एसयूव्ही प्रकारातली असून तिच्या किमती ६४.९० लाखांपासून सुरू होत आहेत.[nextpage title=”९)बीएमडब्ल्यू आय एट”]
bmw-i8
स्पोर्टस कारप्रमाणे कर्तबगारी, सुपरकारसारखे दिसणे आणि छोट्या कार इतके इंधन वापर अशी ही बहुगुणी, बहुदुधी व आखूडशिंगी म्हैस असावी तशी कार. हिच्या किमती २.२९ कोटी रूपयांपासून सुरू होत असून भारतातील श्रीमंत वर्गाने या कारला चांगली पसंती दिली आहे.[nextpage title=”१०) मर्सेडिज एएमजी जीटीएस”]
mercedes
मर्सेडीज या नावाचा भारतीय बाजारात दबदबा आहेच. ही कार त्याला अपवाद नाही. ही दमदार कार २ कोटी ४० लाखांपासून उपलब्ध असून ० ते १०० किमीचा वेग ती ४ सेकंदात घेते.

Leave a Comment