येथे कोणत्याही वस्तूला हात लावलात तर भरा दंड

malana
हिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ असलेले मलाणा गाव पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. मात्र येथे पर्यटकांना एक खबरदारी घ्यावी लागते व ती म्हणजे कोणत्याही नागरिकाला हाताने स्पर्श करणे येथे निषिद्ध असून असा स्पर्श झालाच तर १ हजार रूपये दंड भरावा लागतो.

निसर्गसंपदेचे वरदान लाभलेले हे असे एकमेव गांव आहे जेथे अकबराची पूजा केली जाते. येथील परंपराही विचित्र आहेत तरीही येथे पर्यटकांची गर्दी असतेच. दुकानातून समजा कांही सामान घ्यायचे असेल तरी दुकानदार मागितलेल्या वस्तू कौंटरवर ठेवतो व ग्राहकही वस्तूचे पैसे कौंटरवरच ठेवतो. दोन हजार वर्षांपूर्वीची जगातील पहिली लोकशाही या गावापासून सुरू झाली असाही समज आहे. येथील मूळ निवासी स्वतःला सिकंदराचे वंशज मानतात. त्यांच्या भाषेत कांही ग्रीक शब्दही आहेत. आणि त्यांचे रितीरिवाजही वेगळे आहेत.

गावात प्रवेश केलात की प्रथमच तुम्हाला कोणालाही स्पर्श करू नका अन्यथा १हजार रू.दंड भरावा लागेल अशी पाटी दिसते.

Leave a Comment