नवीन वर्षापासून यूएएन नंबरविना मिळणार नाही पीएफ

epfo
नवी दिल्ली – देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून १ जानेवारीपासून यूएएन नंबरविना तुम्हाला पीएफ काढता येणार नाही. आता पर्यंत पीएफ काढण्यासाठी पीएफ नंबर फक्त ग्राह्य धरला जात होता. पण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मुख्यालयाच्या आदेशानुसार पीएफ कार्यालये फक्त तेच दावे स्वीकारेल ज्यावर कर्मचाऱ्याचा यूएएन असेल. त्याचबरोबर कर्मचाऱ्याचे बँक खाते आधार कार्ड समवेत केवायसीशी जोडलेले लागणार आहे. त्यानंतरच त्या कर्मचाऱ्याला त्याचा पीएफ काढता येऊ शकतो.

Leave a Comment