देशभरामध्ये ११ सॉफ्टवेअर पार्क

ravishankar-prasad
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बिहार राज्यातील भागलपूर आणि दरभंगा या ठिकाणी सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. देशभरामध्ये ११ सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क उभारण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे, यामध्ये उत्तर प्रदेशच्या पाच, ओडिसाच्या चार आणि बिहारच्या दोन पार्कचा समावेश आहे. २०१८ पर्यंत हे पार्क पुर्ण होणार आहेत.

सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क उभारण्यास बिहार राज्यातील आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया हॅबिटेट सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये दिली. या ठिकाणी सॉफ्टवेअरशी संदर्भात कंपन्या उभारण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होणार आहे.

Leave a Comment