चहा विक्रेत्याची मुलगी झाली न्यायाधीश

judge
नवी दिल्ली : परिस्थितीवर मात करून यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली-ऐकली आहेत. त्यालाच अनुसरून एक उदाहरण पंजाबमध्ये समोर आले आहे. ज्या न्यायालयात आयुष्यभर चहा विकून संसार चालवला, त्याच बापाची मुलगी आता त्याच न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान झाली आहे.

आपली संपूर्ण हयात सुरेंदर कुमार यांनी न्यायालयात चहा विक्रेता म्हणून घालवली. त्याच न्यायालयात आपली मुलगीही काळा कोर्ट परिधान करुन येण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्या वडिलांचे स्वप्न या मुलीने स्वत:चे समजले आणि तिने जिद्द, चिकाटीच्या जोरावर सत्यातही उतरवले.

पंजाब प्रशासकीय सेवा (कायदा) परीक्षा २३ वर्षीय श्रुती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. श्रुती आता एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर न्यायाधीश म्हणून रुजू होण्यास सज्ज झाली आणि ती न्यायाधीश म्हणून त्याच न्यायालयात येणार ज्या न्यायालयात तीचे वडील चहा विकायचे. कायदा क्षेत्रातच मला करिअर करायचे होते आणि न्यायाधीशपदालाच मी प्राधान्य दिल्यामुळेच तयारी करून मी परीक्षा दिली आणि एससी कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्याचे श्रुती सांगते.

Leave a Comment