गुगलचा ‘वायफाय’ घाबरला लोकसंख्या पाहून

railway-6
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी गुगल सोबत भारतीय रेल्वेने करार केला होता. रेल्वे स्थानकांचा सर्वे करण्यासाठी गुगलची टीम आली होती. पण गुगलची टीम रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुन घाबरली.

बरेली, मुरदाबाद, लखनऊ, दिल्ली, यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर वायफाय लावण्यात येणार होते. जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशातील रेल्वे स्थानकांसाठी तयार करण्यात आलेला वायफाय भारतात लावण्याचा निर्णय गुगलने घेतला होता. भारतातील रेल्वे स्थानकावर केलेल्या सर्वेनुसार भारतात २४ तासातच प्रवाशांची संख्या हजारोंच्या वर जात असल्यामुळे हे वायफाय येथे चालणे अवघड आहे. त्यासाठी गुगल आता लोकसंख्येनुसार वेगळे वायफाय तयार करणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात तरी रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा मिळणार नाही हे निश्चित झाले आहे.

Leave a Comment