खासगी बँकांतूनही होणार रेल्वे तिकीटांचे आरक्षण

railway
पुढच्या वर्षापासून खासगी क्षेत्रातील बँकांमध्येही प्रवासी रेल्वे तिकीटांचे बुकींग करू शकणार असून या महत्त्वाच्या योजनेची घोषणा यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात केली जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे. या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पासाठी एका खासगी बँकेशी करारही करण्यात आला असल्याचे समजते. रेल्वेने यापूर्वीच ग्रामीण भागातील प्रवाशांना पोस्टातून रेल्वे तिकीट बुकींगची सुविधा उपलब्ध करून दिली असून आता शहरी प्रवाशांसाठी बॅकातून तिकीटे बुकींगची सुविधा दिली जात आहे.

तिकीटे बुकींगसाठी बँकांना प्रति तिकीटामागे १० रूपये दिले जाणार आहेत. तसेच बँकेला या साठी स्वतंत्र माणूस नेमण्याची आवश्यकता नाही कारण एटीएम प्रमाणेच किआस्क एटीएममधून ही तिकीटे आरक्षित करता येणार आहेत. या संदर्भात कोणत्या बँकांशी करार करायचे व ही सुविध सध्या कोणत्या शहरातून उपलब्ध करायची हे ठरविण्याचे सर्व अधिकार मंडळ मुख्यालयाला दिले गेले असल्याचेही समजते.

Leave a Comment