कार्बनने लॉन्च केला २ जीबी रॅम असलेला बजेट स्मार्टफोन

karbbon
नवी दिल्ली – नवीन फिचर असलेले दोन मोबाईल भारतीय मोबाईल निर्मिती कंपनी कार्बनने लॉन्च केले असून हे दोन मोबाईल टायटेनियम मोघुल आणि टायटेनियम एस२०५ जीबी असे आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ५ हजार ७९० आणि ६ हजार ७९० अशी आहे.

कंपनीच्या वतीने कार्बनच्या लॉन्च करण्यात आलेल्या टायटेनियम स्मार्टफोन सिरीजमध्ये स्टाईल आणि फिचरची सांगड घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. १.२GHz क्वाड कोर प्रोसेसर, १२.७ सेमी एचडी स्क्रिन, ड्रॅगन ग्लास, ८ मेगापिक्सेल कॅमेरा, एलईडी फ्लॅश बॅक कॅमेरा, ३.२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि २००० एसएएच बॅटरी असे फिचर टायटेनियम मोघुलमध्ये आहेत. १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरीसह या मोबाईलचे एक्सापांडेबल मेमरी स्टोरेज ३२ जीबी आहे. तसेच यामध्ये ४.४ किटकॅट व्हर्जन आहे.

टायटेनियम एस२०५ जीबी स्पोर्ट्सची स्क्रिन साईज टायटेनियम मोघुल एवढीच आहे. मात्र एचडी आयपीएस स्क्रिनचे रिझोलुशन अधिक आहे. ड्युअल सीम असलेल्या एस२०५ मध्ये १.२ GHz क्वाड कोर प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉम मेमरी आहे. तसेच त्यामध्ये अॅन्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप व्हर्जन असून त्याचे एक्सापांडेबल स्टोरेज ३२ जीबी आहे. मात्र या मोबाईलमध्ये २२०० एमएएच लिथियम पॉलिमर बॅटरी असल्याने बॅटरी लाईफ अधिक आहे.

Leave a Comment