सावध राहा जीव घेणाऱ्या आणि अंध बनविणाऱ्या दारूपासून

alcohol
लंडन- तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्य पिऊन जल्लोष करणाऱ्यांसाठी दिला असून काही ठिकाणे अशी दारू मिळते की जी प्यालामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकते, तुम्ही बेशुद्ध पडू शकाल इतकेच नव्हे तर तुमचा जीव देखील जाऊ शकतो अशी सूचना तज्ज्ञांनी दिली आहे.

अनेक घातक द्रव्ये, रसायने असलेली हजारो लीटरची दारू जप्त झाल्यामुळे इतर साठ्यातही ही रसायने असू शकतात असे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी अॅंटी फ्रीजसाठी वापरण्यात येणारे रसायन आयसोप्रोपॅनॉल आणि क्लोरोफोम असलेली दारू जप्त करण्यात आली असून ही दारू प्राशन केल्यास ती व्यक्ती प्रसंगी कोमातही जाऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात.

काही दारूमध्ये नेल पॉलिश रिमूव्हर्स, सिगरेट्स आणि डिंकामध्ये वापरले जाणारे इथिल असिटेटही आढळून आले आहे. १ लाख ३० लीटरचा व्होडका विगान येथे जप्त करण्यात आली. अनेक लोकांना ३१ डिसेंबर रोजी बार्गेनिंग करायला आवडते. त्यामुळे हलक्या प्रतीची दारू अनेक दुकानदार ठेवतात. माहिती नसलेले ब्रॅंड्स ठेऊ नका अशी सूचना देण्यात आली आहे. ही जनजागृती लंडन आणि वेल्स या भागात एलजीए या संघटनेतर्फे केली जात आहे. काही फसवे ब्रॅंड्स प्रसिद्ध ब्रॅंडसची नक्कल करतात. त्या मद्य निर्मात्यांपासून सावध राहावे असे सांगण्यात आले आहे.