सौदी कच्च्या तेलाच्या किंमती वाढविणार

saudi
सौदी सरकारने कच्च्या तेलांच्या किमतीत ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. ही वाढ प्रचंड मानली जात असून त्यामुळे जगभरातील तेलांच्या किंमतीवर प्रभाव पडणार आहे. सौदीच्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले गेलेले नसले तरी महसूली तूट भरून काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या कांही महिन्यात तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती बॅरलला ४० डॉलर्सपेक्षाही खाली आल्या आहेत. सौदी हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र किंमती घसरल्याने यंदाच्या वर्षात सरकारच्या महसूली तुटीची रक्कम ६६ अब्ज युरोंवर गेली आहे. सौदी सरकारला मिळणार्‍या महसूलात ८० टक्के महसूल या तेल निर्यातीतून येतो. महसूली तूट भरून काढून अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी तेल किमती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला असावा असे सांगितले जात आहे.

Leave a Comment