व्हर्टूचे स्टायलीश पण महागडे स्मार्टफोन्स

[nextpage title=”व्हर्टूचे स्टायलीश पण महागडे स्मार्टफोन्स”]
collarge
महाग स्मार्टफोन म्हणून अॅपलचे आयफोन प्रसिद्ध असले तरी ती जगातील सर्वाधिक महागडे फोन विकणारी कंपनी नाही. तो मान जातो ब्रिटनच्या व्हर्टू कंपनीकडे. ही कंपनी जगातील सर्वाधिक महाग फोन बनविण्याबाबत प्रसिद्ध असून त्यांचे हे फोन अत्यंत स्टायलिश आणि फॅशन सिंबॉल म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या फोनच्या किंमती ५० हजारांपासून ते २ कोटी रूपयांपर्यंत आहेत आणि त्यात मौल्यवान धातू, कांगारू, ऑस्ट्रीच, मगर अशा प्राण्यांच्या कातडीचा वापरही केला जातो. त्याचबरोबर हिरे सोनेही मुबलक प्रमाणात वापरले जाते. त्यामुळेच हे फोन स्टाईल आयकॉन बनले आहेत. ही कंपनी चर्चेत आली त्यांनी भारतात नुकत्याच सादर केलेल्या अॅस्टर फोन मुळे. या फोनची किंमत आहे ४ लाख ७५ हजार रूपये.

असेही समजते की या फोनमध्ये सफायर क्रिस्टल ग्लासपासून बनविेलेला स्क्रीन वापरला जातो. ही सर्वात मजबूत काच समजली जाते आणि ती फुटत नाही. या फोन्सच्या कीपॅडमध्ये हिरे, माणके बसविली जातात. विशेष म्हणजे ते ग्राहकाला हवे तसे बनवून दिले जातात. म्हणजे कस्टमाईज करून दिले जातात. तसेच या फोनचे डिझाईन जानेमाने डिझायनर करतात व हे फोन हँडमेड असतात.

ही कंपनी नोकियाने १९९८ साली सुरू केली होती मात्र नंतर ती २०१२ मध्ये ईक्यूटी फर्मला विकण्यात आली. या कंपनीचे फोन फक्त निवडक ५०० फॅशन स्टो्अर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून ते मोबाईल शॉपमध्ये मिळत नाहीत.[nextpage title=”१)व्हर्टू सिग्नेचर कोब्रा”]
1-vartu
या फोनची किंमत आहे ३ लाख ३५ हजार डॉलर्स म्हणजे २ कोटी २० लाख रूपये. जगातील हा सर्वात महागडा फोन आहे. फ्रेंच ज्वेलर बॉचरॉनने त्याचे डिझाईन केले आहे. त्यात १ पियरकट हिरा, १ गोल सफेद हिरा, २ पाचू, ४३९ माणके जडविली गेली आहेत. प्री ऑर्डर नुसार तो बनविला जातो आणि अत्यंत लिमिटेड एडीशन फोन आहे.[nextpage title=”२)व्हर्टू सिग्नेचर डायमंड”]
2-vartu
या फोनची किंमत आहे ८८ हजार डॉलर्स म्हणजे ५८ लाख रूपये. या फोनमध्ये प्लॅटिनम या महागड्या धातूचा वापर केला गेला आहे. पिंक कलर शेडमधल्या या फोनमध्ये हिरेही जडवले आहेत. या मॉडेलचे फक्त २०० फोन बनविले गेले आहेत.[nextpage title=”३) व्हर्टू सिग्नेचर किशू २०१०”]
3-vartu
या फोनची किंमत जाहीर केली गेलेली नाही. मात्र जपानमध्ये कंपनीने त्यांच्या वर्षपूर्तीनिमित्ताने हा फोन २०१० मध्ये सादर केला होता. हा फोन चार वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सादर केला गेला आणि त्याचे कीपॅड सोन्याचे आहे.[nextpage title=”४) व्हर्टू अॅसेंट जीटी”]
4-vartu
या फोनची किंमत आहे ३ लाख ७४ हजार रूपये. २०११ मध्ये तो लाँच केला गेला आणि त्याचे डिझाईन फेरारीच्या पार्श्वभूमीवर केले गेले आहे. यालाही सफायर क्रिस्टल मेटल वापरले गेले असून कीपॅड स्टेनलेस स्टीलचे आहे.[nextpage title=”५)व्हर्टू अॅस्टर”]
5-vartu
कांगारू, ऑस्ट्रीच या प्राण्यांच्या कातडीचा वापर या फोनमध्ये केला गेला आहे. टायटेनियम ग्रेड पाच मेटलचा वापरही केला गेला असून बॉडी कव्हर सफायर क्रिस्टलचे आहे. भारतात हा फोन नुकताच लाँच झाला आहे. त्याची किंमत आहे ४ लाख ७५ हजार रूपये.[nextpage title=”६)व्हर्टू कॉन्स्टीलेशन २०१३”]
6-vartu
या फोनची किंमत ३ लाख ५५ हजार रूपये असून तो टायटेनियम मेटलपासून बनविला गेला आहे. त्याला प्रिमियम लेदर फिनिशिंग केले गेले आहे. त्यालाही सफायर क्रिस्टल ग्लास दिली गेली आहे.

Leave a Comment