वेड्यासारखा रस्त्यावर फिरतो आहे आईन्स्टाईनला आव्हान देणारा संशोधक

narayan
पाटणा – बिहारमध्ये सध्या एक असे उदाहरण पाहायला मिळते आहे एकदा का नशिबाचे वासे फिरले की निष्णात गणितज्ज्ञाचीही काय अवस्था होऊ शकते. ज्यांची बिहारचे आईन्स्टाईन म्हणून ओळख ते वशिष्ठ नारायण सिंह यांची अवस्था आज एखाद्या वेड्यासारखी झाली आहे. त्यांना स्वप्नातही आपली अशी अवस्था होईल असे वाटले नसावे.

गणित संशोधन क्षेत्रात थेट आईन्स्टाईनलाच आव्हान देणारे नाव वशिष्ठ नारायण सिंह. त्यांनी जगाचे लक्ष ‘सायकल व्हेक्टर स्पेस थिअरी’वर संशोधन करुन वेधले होते. आजही अमेरिकेत त्यांच्या संशोधनाचा अभ्यास केला जातो. देश त्यांना विसरला असला तरी अमेरिकेला मात्र आजही त्यांची आठवण आहे.

भोजपूरमधील एका गरीब कुटुंबामध्ये सिंह यांचा जन्म झाला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ते राज्यात पहिले आले होते. पाटणा सायन्स कॉलेजमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर १९६५ मध्ये ते अमेरिकेला गेले. कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी पीएच डी केले. त्यानंतर ते अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये कार्यरत होते. तीन वर्षे त्यांनी नासामध्ये काम केले. त्यानंतर १९७४ साली सिंह परत आले. वशिष्ठ यांना नासाने अनेक चांगल्या-चांगल्या ऑफर दिल्या. मात्र त्याला ते भुलले नाहीत. सर्वकाही सोडून ते भारतात परतले. कदाचित त्यांच्या जीवनातील हा सर्वात चुकीचा निर्णय असावा.

भारतात परत आल्यावर त्यांनी १९७२ ते १९७४ दरम्यान आयआयटी कानपूरमध्ये अध्यापनाचे काम केले. याच काळात त्यांनी मानसिक रोगाने पछाडले. वशिष्ठ यांना स्किझोफ्रेनिया हा दुर्धर मानसिक रोग झाला. त्याच अवस्थेत ते त्यांच्या मूळ गावी आरा येथे परतले. आज त्यांची अवस्था रस्त्यावरील एखाद्या वेड्यासारखी आहे. आरामधील रस्त्यांवर ते अक्षरशः वेड्यासारखे फिरताना दिसतात. राज्य आणि केंद्रात अनेक सरकारे आली आणि गेली मात्र या महान सशोधकाची आठवण कुणाला झाली नाही. एकेकाळी आइन्स्टाईनच्या E = mc² या सापेक्षतावादाच्या जगप्रसिद्ध समिकरणालाच आव्हान दिले होते.

Leave a Comment