पृथ्वीच्या दिशेने झेपावली उल्का

nasa
वॉशिंग्टन : एका मोठ्या धोक्यातून नुकतीच पृथ्वी वाचल्याची सूचना अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने दिली असून नासाने पृथ्वीकडे झेपावणा-या आगीच्या गूढ गोळ्याचा व्हीडीओ नुकताच प्रसारित केला आहे. जॉर्जियातील अनेकांना हा गोळा दिसल्यानंतर नासाने याबाबतचा खुलासा केला आहे.

जॉर्जियामध्ये अनेकांना आकाशातून शहरावर आगीचा गोळा वेगाने येत असल्याचे दिसले होते. त्यानंतर याबाबतचे गूढ आणखी वाढले. नासाने नुकतेच याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जॉर्जियाच्या आकाशात सुमारे ५० मैल अंतरावर उल्का टिपणा-या नासाच्या सर्वच ६ कॅमे-यांना आगीचा गोळा पृथ्वीकडे झेपावताना दिसला होता. ज्यावेळी या कॅमे्यांनी ही उल्का टिपली, त्यावेळी तिचा वेग ताशी ९००० कि.मी. एवढा होता. मात्र त्यावरून केलेल्या गणिती हिशेबानुसार या उल्केचा अवकाशातील वेग तब्बल २९००० किमी. प्रतितास होता, असेही नासाने म्हटले आहे. इतर उल्का जशा आकाशातच पूर्णपणे नष्ट होतात. त्याप्रमाणेच याही उल्केचे झाले असेही नासाने स्पष्ट केले आहे. पृथ्वीवर राखेच्या स्वरूपात तिचे अवशेष पोहोचण्याची शक्यता, मात्र नासाने वर्तवली आहे. नासाने ही उल्काच असल्याचे जरी म्हटले असले तरी याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. त्या संशोधनानंतरच संबंधित आगीचा गोळा म्हणजे उल्काच होती का, याविषयी अधिक खुलासा होईल, असेही नासाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment