नवी दिल्ली – महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सर्व मोबाईलमध्ये मार्चपासून पॅनिक बटण सुरु करण्याची योजना बनवली असून यात फक्त संकटग्रस्त महिलांना मोबाईलवरील ९ नंबर डायल करायचा असून ज्यामुळे त्यातून एक एसएमएस पोलिसांकडे जाईल अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी नुकतेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दिली होतो.
महिला सुरक्षा; मार्चमध्ये येणार पॅनिक बटण
जर का एखादी महिला संकट सापडली असेल तर त्या महिलेने आपल्या मोबाईलवरील ९ नंबरचे बटण काही वेळ दाबून ठेवल्यास मोबाईलमधून एक एसएमएस पोलिसांव्यतिरिक्त अन्य ९ लोकांना जाईल. हा एसएमएस कोणाला पाठवायचा हे ती महिलाच ठरवू शकते. हे बटण दाबल्यानंतर संकटात सापडलेल्या महिलेचे लोकेशन जीपीएसच्या माध्यमातून उपलब्ध होईल.
याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नुकतीच महिला आणि बालकल्याण मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाने देशातील टेलिफोन ऑपरेटर आणि मोबाईल उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांशी चर्चा केली असून या चर्चेत काही मुद्यावर दोन्हीकडून सहमती झाली आहे. ज्याप्रमाणे हे पॅनिक बटण सामान्य मोबाईलमध्ये वेगळे दिले जाईल त्याचप्रमाणे स्मार्टफोनमध्ये अॅपच्या माध्यमाने दिले जाईल.
आता ही सुविधा प्राप्त करण्यासाठी जर का आपल्याकडे जुना मोबाईल फोन असेल तर आपल्याला मोबाईल सुविधा देणाऱ्या कंपनी अथवा डीलरकडे जाऊन ही सुविधा मिळवू शकता. तर दुसरीकडे काही मोबाईल कंपन्याच्या स्टोरमध्ये ही सेवा मोफत उपलब्ध केली जाईल.