भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे

[nextpage title=”भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे”]
collarge
हिंदू धर्मात ३३ कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातील गावात सुद्धा किमान दोन तीन देवळे आढळतात. देवदेवतांची मंदिरे उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे आणि त्याकाळी कोणत्याही सुविधा आणि आधुनिक हत्यारे नसतानाही अत्यंत भव्य अशी मंदिरे येथे बांधली गेली. त्यांचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासूनही सापडतो. कांही मंदिरे महाभारत, रामायण कालीन असल्याचेही सांगितले जाते. भारतातील अशाच हजारो वर्षे जुन्या प्राचीन आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या १० मंदिरांची ही माहिती. या मंदिरांबद्दल अनेक आख्यायिका आहेत. तसेच त्यांच्याभोवती गूढ रहस्याचे वलयही आहे.[nextpage title=”१)जगन्नाथ मंदिर”]
jagnnath
ओडिशातील जगन्नाथपुरी येथील हे जगन्नाथाचे मंदिर. जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, जगाचा नाथ. वैष्णव संप्रदायाचे हे मंदिर फार प्राचीन आहे आणि भारतातील चारधाम क्षेत्रातील ते एक आहे. या मंदिरात लाकडापासून बनविलेल्या जगन्नाथ, बलराम व सुभद्रा या भावंडांच्या मूर्ती आहेत आणि दरवर्षी येथे प्रचंड मोठा रथोत्सव होतो. एखादे अवघड व अशक्य काम अनेकांनी मिळून पूर्ण करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हटले जाते कारण याजगन्नाथाचा प्रचंड रथ अक्षरशः लाखो भाविक ओढून नेत असतात.[nextpage title=”२)मीनाक्षी मंदिर”]
meenakshi
तमीळनाडूतील मदुराई येथे असलेले हे भव्य मंदिर भारताच्या प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे हे मंदिर. मीनाक्षी हे पार्वतीचेच नांव असून भारतात जेथे जेथे पार्वती मंदिरे आहेत त्यातील पवित्र स्थानांपैकी हे एक आहे. या मंदिरचे गर्भगृह ३५०० वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. अतिशय भव्य गोपुरांनी नटलेले हे विशाल मंदिर पर्यटकांचेही आकर्षण आहे.[nextpage title=”३)तिरूपती बालाजी”]
tirupati
आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील हे प्रसिद्ध बालाजी मंदिर जगभरात ख्यात आहे. वास्तुकलेचा अजोड नमुना म्हणूनही ते प्रसिद्ध आहे आणि देशातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही ते परिचित आहे. सात पहाडानी बनलेल्या तिरूमला पहाडांवर हे मंदिर असून हे पहाड जगातले दोन नंबरचे प्राचीन पहाड आहेत. वेंकटेश्वराचे हे मंदिर अहोरात्र भाविकांच्या गर्दने फुललेले असते. वेंकटेश हा विष्णुचा अवतार आहे.[nextpage title=”४)वैष्णोदेवी”]
vaishnodevi
भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थळपैकी एक असलेले हे स्थल त्रिकुटा हिल्सवर आहे. येथे एका गुहेत तीन पिंड असून ते देवीचे प्रतीक आहेत. पुराणातील कथेनुसार वैष्णोदेवीने राक्षसाचा वध करून येथे विश्रांती घेतली आहे. सुमारे १२ ते १३ हजार फू ट उंचीवरचे हे स्थान खडतर मार्ग पार करून गाठावे लागते. कोणत्याही क्षणी बदलणारे हवामान आणि प्रचंड थंडी सोसत दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनास जात असतात.[nextpage title=”५)सोमनाथ”]
somnath
पुराणात उल्लेख असलेल्या महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी पहिले असलेले हे स्थळ गुजराथेतील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदराजवळ आहे. प्रत्यक्ष चंद्रदेवाने हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. याचे उल्लेख ऋग्वेदातही आहेत. हे मंदिरही श्रीमंत देवस्थान असून ते १७ वेळा लुटींसाठी नष्ट केले गेले होते व परत परत ते बांधले गेले. या मंदिराला आजही भाविकांकडून दरवर्षी कोट्यावधींच्या देणग्या दिल्या जातात.[nextpage title=”६)काशी विश्वनाथ”]
kashi
१२ ज्योर्तिलिगात या मंदिराचाही समावेश असून या मंदिरातील विश्वेश्वराचे एकदा दर्शन घेतले आणि गंगास्नान केले तर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार १७८० सालात केला होता त्यानंतर १८५३ साली महाराजा रंजीतसिंह यांनी या मंदिराला १ हजार किलो सोन्याने मढविले असे सांगितले जाते.[nextpage title=”७)पद्मनाभ मंदिर”]
padmanabh
केरळाची राजधानी तिरूवनंतपुरम येथील हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. मध्यंतरी या मंदिराच्या तळघरात सापडलेल्या लक्षावधी रूपयांच्या जडजवाहीरानी ते एकदम प्रकाशात आले. त्रावणकोर शाही परिवाराकडे या मंदिराचे व्यवस्थापन आहे. प्राचीन द्रविड शैलीत बांधलेल्या या प्रचंड मंदिरात शेषशाई विष्णुची प्रंचड मोठी मूर्ती आहे. येथेही पर्यटकांची मोठी गर्दी असते.[nextpage title=”८)गुरूवायूर”]
guruvayoor
केरळातील हे श्रीकृष्णाचे मंदिर विष्णुदेवांचे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. कौलारू बांधणीच्या या प्रचंड मंदिरातील कृष्णमूर्ती अतिशय सुंदर आहे. हे मंदिर ५ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे पुरावे मिळतात. हेही भारतातील श्रीमंत देवस्थानातील एक आहे.[nextpage title=”९)मुंडेश्वरी मंदिर”]
mundeshwari
बिहार राज्यातले हे मंदिर १७०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि येथे पार्वतीही आहे. या मंदिराचे पौराणिक महत्त्व मोठे आहे.[nextpage title=”१०)कामाख्या मंदिर”]
kamakhya
आसाममधील हे मंदिर फार प्राचीन आहे आणि देशात तसेच जगातही ते प्रसिद्ध आहे. दुर्गादेवीचे हे मंदिर पाहण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथेही भाविकांची खूप गर्दी असते. पार्वती देवीचा ५१ शक्ती पीठातील हे महत्वाचे मंदिर आहे.

Leave a Comment