अनोखे संशोधन; अ‍ॅपच्या मदतीने बालमृत्यू दरात घट

app
कोपनहेगन : अनेक विकसनशील देशांत प्रसूतिकालीन माता आणि बालमृत्यूची समस्या आढळून येते. काही प्रमाणात ही समस्या कमी करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. अशा प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन दक्षिण डेन्मार्क आणि कोपनहेगन विद्यापीठाने तयार केल्यामुळे माता मृत्युदरात घट करण्यात द सेफ डिलिव्हरी अ‍ॅपची मदत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

त्याशिवाय गर्भनाळ वेगळे करणे, बाळाला शुद्धीवर आणणे आणि संक्रमणापासून संरक्षण करणे यावरही क्रमबद्ध उपाय सांगण्यात आले आहेत. कोपनहेगनच्या मॅटर्निटी फाऊंडेशनच्या प्रमुख अ‍ॅना फेल्सन म्हणाल्या, हा अ‍ॅप आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. विशेष करून दुर्गम भागात कार्यरत असलेल्यांना त्याची चांगली मदत होऊ शकते. आरोग्य सेवकांना अनेकदा वर्गात बसून प्रशिक्षण देणे शक्य होत. अ‍ॅपमुळे आरोग्य मदतनिसांना केवळ एक वर्षात प्रशिक्षण मिळते. अ‍ॅपमध्ये अ‍ॅनिमेटेड व्हीडीओ गाईड उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रसूतीच्या वेळी निर्माण होणा-या समस्यांबद्दलची माहिती यातून दिली जाते. लांबलेला गर्भकाळ, हायपरटेंशन, संक्रमणावरील उपचार इत्यादी गोष्टींची सविस्तर माहिती त्यात देण्यात आली आहे. या अनोख्या आणि नव्या अ‍ॅपमुळे जगभरातील आरोग्य क्षेत्रात नवलाई निर्माण झाली आहे. माता मृत्यू आणि बालमृत्यू दरात घट होण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आरोग्यसेवकांना विद्यापीठ सुरक्षित प्रसूतीचे प्रशिक्षण देत आहे. प्रभावी अंमलबजावणी झाल्यास याद्वारे मोठे बदल होऊ शकतात. आरोग्य क्षेत्रातील ही एक परिर्वतनीय बाब असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment